अकोला,१३ दि. :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरु युवा केंद्रातर्फे शनिवार दि.१५ रोजी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात वय वर्षे १५ ते २९ या वयोगटातील युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. असून त्यात युवक युवतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी महेशसिंह शेखावत यांनी केले आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, खा. संजय धोत्रे, आ. वसंत खंडेलवाल,आ. गोवर्धन शर्मा,आ.रणधीर सावरकर, आ. हरिष पिंपळे, गजानन पुंडकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम आबासाहेब खेडकर हॉल, रामदास पेठ पोलीस स्टेशन समोर, अकोला येथे सकाळी ९ वाजेपासून सुरु होईल. त्यात सकाळी १० वा. कविता लेखन, चित्रकला व मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा, सकाळी साडेअकरा वा. युवा महोत्सवाचे उद्घाटन, दुपारी २ वा युवा संवाद स्पर्धा, दुपारी ३ वा. सांस्कृतिक कार्यक्रम तर दुपारी साडेचार वा. पारितोषिक वितरण होईल.