स्थानिक डॉ.गोपाळराव खेड कर महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य अभ्यास मंडळाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.गोपाल ढोले उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणून तेल्हारा शहरातील लक्ष्मी उदयोग समूहाचे नवोदित संचालक अनुप पालिवाल होते. यावेळी अनुप पालिवाल यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकते विषयी मार्गदर्शन केले. परीक्षा विभाग प्रमुख प्रा. एम.एम.कवरके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.एम.पी.चोपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.उन्हाळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वप्नील फोकमारे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.पुंडकर,प्रा.खिरोडकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिम्मत फोकमारे व सचिन ढोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.