तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा व अकोट तालुक्यातील गावांमाध्ये दि.११आॕक्टो रोजी झालेल्या ढगफुटीमुळे शेतकरी याचे शेतातील काढणीला आलेले सोयाबीन व वेचनीला, आलेल्या कपासी व ईतर पिके ढगफुटीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे उधवस्त झाली आहेत त्यामुळे शेतकरी आर्थीक अडचनीत सापडला आहे तसेच नागरीकांचे नुकसान झाले आहे.
अश्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरीकांना शासनाकडुन तात्काळ मदत मिळावी या मागणी करीता तालुका अध्यक्ष अशोक दारोकार यांचे नेतृत्वामध्ये तहसिलदार तेल्हारा यांणा निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी मधुसुधन बरिंगे तालुका महासचिव , मनिष राहाटे कोषाध्यक्ष मो.मुबीन सिद्दीकी उपसभापती, प्रा. संजय हिवराळे गटनेता, प्रकाश खोब्रागडे, मो.इद्रीस, विकास पवार, संदिप गवई, अनंता इंगळे, संघर्ष वानखडे सरपंच, प्रसिध्दी प्रमुख सिध्दार्थ गवारगुरु राजपाल तायडे, संघपाल गवारगुरु आनंद बोदडे, सागर सुरळकर,रोषन दारोकार, प्रविण डोंगरे, अमर भारसाकळे विलास दामोदर, खंडुजी घाटोळ, बाळकृष्ण अरबट दुर्योधन तयडे, संदेश घनबहादुर, जयानंद बोदडे, विक्की तायडे, मिलिंद वानखडे यांचे सह व़ंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.