अकोला,दि.5 : जिल्हा परिषद आरोग्य विभाग, एम राईट व वाय.आर.जी. केअर यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण प्रचार व प्रसारकरीता मोबाइल व्हॅनव्दारे जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचाररथाला आज जिल्हा परिषदच्या परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, वाय.आर.जी. केअरचे जिल्हा प्रशासक समन्वयक नितीन डोंगरदिवे, रविकुमार मांजरे, अमोल डोंगरदिवे यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण वेगाने सुरु असून ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामिण भागात दि. 1 नोव्हेंबरपर्यंत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती महिला, अपंग व्यक्ती लसीकरण केंद्रापर्यंत जावू शकत नाही अशा व्यक्तींना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोबाईल व्हॅनव्दारे घरपोच लसीकरण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.