उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील लेडी कंडक्टरने एसटी महामंडळाच्या खाकी ड्रेसवरील (Tik Tok) व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या प्रकरणी तिला व तिच्या साथीदाराला एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर गाण्याचे व्हिडिओ तयार करून रातोरात स्टार झालेले व नशीब पालटलेले किस्से आपण पाहिलेत आहेत, यामधे अनेक जण मालामाल झाले आहेत. पण सोशल मीडियावर परिवहन महामंडळाच्या ड्रेसवरील (गणवेश) व्हिडिओ तयार करणे कळंब बस आगारातील टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल सागर गिरी व तिचा सहकारी कंडक्टर कल्याण कुंभार याला महागात पडले आहे अन् चक्क निलंबनाला सामोरे जावे लागले आहे.
कळंब बस आगारातील लेडी कंडक्टर मंगल सागर गिरी हिचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. विविध प्रकारच्या व्हिडिओमुळे लेडी कंडक्टर मंगल सागर गिरी ह्या चर्चेत आल्या होत्या. सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या होत्या. पण लेडी कंडक्टर मंगल यांनी चक्क ऑन ड्युटीवरील खाकी वर्दीतील बस चालवणे तसेच प्रवाशांचे तिकीट फाडीत असणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले.
यामुळे टिकटॉक स्टार बनू पाहणाऱ्या मंगल सागर गिरी व तिचा सहकारी कल्याण कुंभार यांना एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी कळंब आगाराचे व्यवस्थापक मुकेश कोमटवार यांनी त्यांना निलंबीत केले. रातोरात स्टार बनू पाहणाऱ्या या लेडी कंडक्टरला अखेर निलंबनाला सामोरे जावे लागले आहे.