पातूर (सुनिल गाडगे): नुकताच भातकुली येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालय कुस्ती स्पर्धे मध्ये श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे 3 मल्ल यांनी आपल्या नवलौकीका प्रमाणे उत्कृष्ट खेळ करून सिल्वर मेडल ला गवसनी घातली. या मध्ये पै.आदर्श संजय पेंढारकर, पै. शिव संजय यादव,पै.दिपक महादेव बलकर यांचा समावेश आहे.
या कामगिरी बद्दल या कुस्तीपटू वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.आपल्या यशाचे श्रेय या कुस्तिपटूनी आपले मार्गदर्शक ,पै.संजय यादव,पै.चंदू वानखडे(वस्ताद) पै सुरेश श्रीनाथ मंगेश गाडगे पै अक्षय तायडे यांना दिले आहे.