तेल्हारा- तेल्हारा येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव तेल्हारा येथे वाणिज्य विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जीवन विमा निगम शाखा अकोट तर्फे रोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाखा अधिकारी नरेंद्र लबडे आणि विकास अधिकारी प्रवीण काळे, सुमित भगत व प्रवीण राऊत इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. धीरज नजान यांनी केले. तर प्रमुख वक्ता म्हणून नरेंद्र लबडे, प्रवीण राऊत आणि प्रवीण काळे यांनी आपल्या भाषणातून विम्याचे महत्त्व व रोजगाराच्या संधी विषयक विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. गोपाल ढोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन कमवा आणि शिका असा संदेश दिला. त्यानंतर शाखाधिकारी यांनी विद्यार्थ्यासोबत प्रश्नोत्तराचा तास घेतला. त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे निरसन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एम. पी. चोपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन ढोले, हिम्मत फोकमारे यांनी परिश्रम घेतले.