अकोला,दि.29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमार्फत संवाद कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गोरेगाव येथील अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा येथे जिल्हाधिकारी निमा अरोरा व समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी सदिच्छा भेटी दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधून मिळणाऱ्या सोईसुविधांची पाहणी केली. त्यात विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्था, प्रसाधन गृहांची स्वच्छता, ई-ग्रंथालय, अत्याधुनिक वर्ग खोल्यांची पाहणी केली.
तसेच विभागामार्फत मिळालेल्या विज्ञान केंद्राची पाहणी करुन केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते केले. त्यानंतर शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थींनी सोबत संध्याकाळच्या भोजनाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. चव्हाण, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.