अकोला,दि.29 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 7 ऑक्टोंबर रोजी जिल्हा वार्षिक योजना नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव निमा अरोरा यांनी कळविले आहे.
जिल्हा वार्षिक योजना नियोजन समितीची सभा शुक्रवार दि. 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वा. श्री छत्रपती सभागृह नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत सप्टेंबर महिन्याअखेर खर्चाचा आढावा घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.