मुंबई : (प्रतिनीधी) मराठी पञकार परीषदेच्या केंद्रीय कार्यकारणीतील जिल्हा व तालूका पातळी वर संघटन मजबूत करण्या साठी विभागीय सचिव पद हे जबाबदारी व महत्वाचे पद आहे परीषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी राज्यातिल विभागनिहाय विभागीय सचिव पदा च्या नियूक्त्या परीषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमूख यांचे व विश्वस्त किरण नाईक यांचे मार्गदर्शना नुसार जाहीर केल्या असून या विभागीय सचिवाचे सर्वञ कौतूक होत आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज परिषदेच्या नऊ विभागीय सचिवांच्या नावांची घोषणा केली आहे… नव्या विभागीय सचिवांची मुदत दोन वर्षांची असेल..
नवे विभागीय सचिव पुढील प्रमाणे
दीपक कैतके (मुंबई विभाग ) जे. डी. पराडकर संगमेश्वर (कोकण विभाग- ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड) किशोर महाजन, मालवण (कोल्हापूर विभाग :- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्हा) अरूण नाना कांबळे, पिंपरी-चिंचवड (पुणे विभाग : पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा) रोहिदास हाके,धुळे ( नाशिक विभाग :- नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव अहमदनगर जिल्हे) बालाजी सूर्यवंशी, औरंगाबाद : (संभाजीनगर विभाग, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्हे) सचिन शिवशेट्टे, उदगीर : (लातूर विभाग:- लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्हे) अमर राऊत, मेहकर (अमरावती विभाग:- अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम) संजय देशमुख, नागपूर:- ( नागपूर विभाग, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,) विभागीय संघटक, महिला संघटक आणि अन्य पदांसाठीच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत..
नवनियुक्त विभागीय सचिवांचे एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.. नवे विभागीय सचिव संघटनेचा विस्तार आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला आहे.