तेल्हारा (प्रतिनिधी) – लम्पि – ईसापुर येथिल सुरवातीला तिन ते चार जनावरांना लम्पी रोगाची लागन झाली होती माञ ग्रामपंचायत ईसापुरच्या वतीने पशुविभागा मार्फत तातडीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे सुरवातील लागण झालेली जनावरे बरी झाली माञ त्यानंतर ज्या जनावरांना लागण झाली त्यामधील पशुपाल एकनाथ रेलकर यांची गाय आज पाहाटे लम्पी रोगाने दगावली त्यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पशुवैद्यकिय अधिकारी व त्यांची टिम आणी ग्रामपंचायत ईसापुरने आटोकात प्रयत्न करुन सुध्दा अखेर एक गाय दगावल्यामुळे पशुविभाग यांणी आणखी दक्षतेने लक्ष देण्याची गरज असुन पशुपालकांनी सुध्दा दुर्लक्ष न करता आपल्या जनावरांवर लक्ष देवुन या आजाराची लक्षणे दिसताच तात्काळ पशुवैद्यकिय अधिकारी यांचेशी संपर्क सधुन वेळेत उपचार करुन घ्यावे ईसापुर येथिल पशुपालकांनी घाबरुन न जाता लम्पी आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकिय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा लम्पी रोगावर नियंञन मिळवण्यासाठी पशुवैद्यकिय विभाग आणी ग्रामपंचायतच्या वतीने प्रयत्न चालु आहेत.
मिराताई बोदडे
सरपंच ग्रा.पं. ईसापुर