अकोला- दि. १९.०९.२०२२ मोदीजी हे भाकपच्या कार्यालयाचे नव्हे, पीएमओ ऑफीसचे आकडे आहेत, असे म्हणत ‘आयटक’ भारतीय कम्युनिस्ट पक्ष सचिव कॉम्रेड अमरजीत कौर यांनी दि. १८.०९.२०२२ रोजी रविवारी येथे वाढती बेरोजगारी आणि सामान्यजनांच्या आत्महत्या अशा ज्वलंत मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तीन दिवसीय २४ व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचा येथील नेमानी इनमध्ये प्रारंभ झाला. त्या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रातील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. त्यांच्यामते केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील युवकांना रोजगार न देता धर्म आणि अंमली पदार्थाच्या नशेत गुंतून रहायला भाग पाडले. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या अहवालाचा हवाला दिला. शिकून ग्रॅज्युएट झाल्यानंतरही रोजगार न मिळालेल्या देभरातील तरुण विद्यार्थ्यांची संख्या ९० टक्के आहे. त्याचवेळी एकूण आत्महत्यांमध्ये २५ टक्के आत्महत्या या हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांच्या होत असल्याचेही त्यांनी सरकारी अहवालाच्याच आधारे स्पष्ट केले. त्यामुळे हा देश केवळ अदानी-अंबानींना मोठे करणाऱ्यांसाठी चालविला जात असून शेतकरी, कामगार, तरुण, विद्यार्थी अशा इतर घटकांना पूर्णत: दुर्लक्षित ठेवले जात आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, राज्यसचिव कॉ. तुकाराम भस्मे, सहसचिव कॉ. सुभाष लांडे, महिला फेडरेशनच्या कॉ. स्मीता पानसरे, स्वागताध्यक्ष प्रा. साहेबराव विधळे तथा कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड, कॉ. दुर्गा देशमुख, माकप, शेकाप, लाल निशान पार्टी आदींचे रॉलीला हजारों कार्यक्रते उपस्थित होते. यावेळी बोलताना कॉ. डॉ. कानगो यांनी डाव्यांच्या एकजुटीशिवाय भारतात परिवर्तन शक्य नाही, असे सांगत एकजुटीसाठी भाकप नेहमीच पुढाकार घेणारा पक्ष असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, डावे पक्ष हे नेहमी लोकशाही व लोकांना बांधिल आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा येथील गतकाळातील सत्ता त्याचे जीवंत उदाहरण आहे. परंतु तरीही भांडवली पक्ष कम्युनिस्टांना लोकशाहीविरोधी दर्शवून त्यांच्याबद्दल दुष्प्रचार करतात. डॉ. कानगो यांनी सध्या देशात ‘हम दो-हमारे दो’ अर्थात मोदी-शहा आणि अदानी-अंबानी यांचे सरकार असल्याची टीकाही केली. प्रास्ताविक भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर यांनी केले तर संचालन एआयएसएफचे माजी राज्यसचिव सागर दुर्योधन यांनी केले.
अधिवेशनाच्या प्रारंभी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून रॅली काढण्यात आली. कामगार-कर्मचाऱ्यांचा प्रचंड सहभाग आणि लाल झेंड्यांनी व्यापलेले आकाश यामुळे ही रॅली लक्षवेधी ठरली. इर्विन चौक, रेल्वे स्टेशन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ, मालवीय चौक असे वळण घेत ही रॅली दीड तासानंतर अधिवेशन स्थळ असलेल्या नेमानी इनमध्ये पोहोचली. याठिकाणी तिचा समारोप जाहीर सभेत झाला. यावेळी राज्य सचिव कॉम्रेड भस्मे यांना जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला. ती रक्कम त्यांनी पक्षनिधीत जमा केली. या अधिवेशनामुळे विर्भात कम्युनिस्ट पक्ष मजबुत केरळ राज्या प्रमाणे कामगार कष्टकरी विदर्भातील जनतेला सुखाचे व्यवस्थापनाचे प्रयत्न भारतीय कम्युनिस्ट पक्ष करेल असा निश्चय अकोल्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयाटक संघटनेचे कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड, कॉ. दुर्गा देशमुख सरोज मुर्तीजापुरकर, ज्योती ताथोड, मदन जगताप, मायावती बोरकर छाया वारके सविता प्रधान मंगला आढाव, आशा मदने, वंदना डांगे माधुरी परणाटे, सुनंदा पद्मने, कार्यकर्ते सहभागी होऊन केला असे काँग्रेस सुनीता पाटील आपल्या प्रसिद्ध वृत्तपत्र व वाहिनीव्दारे कळवितात.!