अकोला, दि.19 (जिमाका)- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दि.१७ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
या पंधरवाड्याचा शुभारंभ आज श्री.संत गजानन महाराज मंदिर जवळ, कौलखेड येथील सेतू केंद्रावर करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,नायब तहसीलदार सौ. स्वप्नाली काळे, पुरवठा निरीक्षक अमोल पळसपगार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद ठाकूर ,जिल्हा आधार व्यवस्थापक विशाल धोटे, मनोज व प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी यांचे हस्ते नागरिकांना प्रमाणपत्र व रेशन कार्डाचे वितरण करण्यात आले.