तेल्हारा प्रतिनिधीः- जनावरांवरील लम्पी स्कीन आजाराने थैमान घातलेले असतांना ईसापुर येथे पशुपालक आपल्या जनावरांचे नियमीत लसीकरण करुन घेतात त्यामुळे या लम्पी आजाराचा फारसा परिनाम ईथे झाला नाही माञ गेल्या एक दोन दिवसामध्ये एक दोन शेतकऱ्यांच्या जनावरांना आजाराची लक्षणे जानवल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने पशुधन विकास अधिकारी डाॕ.एम.ए.दांदळे त्यांचे सोबत संपर्क साधुन लसीकरण कॕम्प घेण्यात आला यामध्ये जवळपास ३०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले ज्या पशुपालकांनी कॕम्पमध्ये जनावरे आनली नाहीत अश्या.पशुपालकांच्या घरोघरी जाऊन १००% लसीकरण करण्यात आले.
यावेळी पशुधन विकास अधिकारी डाॕ.एम. ए.दांदळे, डाॕ.चव्हाण, पि.टी.शेंडे पशुधन पर्यवेक्षक,प्रसाद वाघमारे परिचर,अंकीत घाटोळे, मयुर राऊत यांणी लसीकरण केले लसीकरण कॕम्प यशस्वी करण्यासाठी उपसरपंच महादेवराव नागे, आनंद बोदडे पञकार,खंडुजी घाटोळ, बळीराम वारुळकर पोलीस पाटील,वसंतराव नागे.राजेश वारुळकर, किशोर घोडस्कार, ग्रा.प. शिपाई संघपाल ससाने सोनु मोडोकार, यांणी प्रयत्न केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक रामदास घाटोळ, वासुदेवराव मोरे मधुसुधन वारुळकर, दिलीप पोहनकार,सुनिल,घाटोळ, शरद बोदडे आदी उपस्थित होते.
पशुधन विकास अधिकारी डाॕ.दांदळे आणी त्यांचे संपुर्ण सहकारी यांचे कार्य कौतुकास्पद असुन त्यामुळे आपल्या गावातील जनावरांना लम्पी आजारातुन मुक्ती मीळणार असुन पशुपालकांनी भिती न बाळगता पशुधन विकास अधिकारी यांचे संपर्कात राहुन उपचार करुन घ्यावे
सौ.मिराताई बोदडे सरपंच
ग्रामपंचायत ईसापुर