(Iran Morality Police) :- इराणमध्ये हिजाब न घालण्याची शिक्षा एका २२ वर्षीय तरुणीला मिळाली. महसा अमिनीला (Iran Morality Police) पोलिसांनी इतकं निर्दयीपणे मारलं की ती कोमामध्ये गेली अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. इराणमध्ये य तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला बेदम मारहाण केली होती. महसा अमिनी कोम्यात गेल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद सुरु झाला होता. (Iran Morality Police)
हिजाब न घातल्याने पोलिसांनी केली होती अटक
२२ वर्षीय महसा अमिनी आपल्या परिवारसोबत तेहरानच्या टूरवर होती. यादरम्यान तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कारण तिनं हिजाब घातला नव्हता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर थोड्या वेळाने तिला हृदयविकाराचा झटकाही आला. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
अल जजीराने म्हटलं की, “दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह वैद्यकीय परीक्षक कार्यालयात हलवण्यात आला आहे.”
पोलिसांची निर्दयता
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी अमिनीला पकडलं आहे. तिला एका पोलिस वाहनातून जबरदस्तीने नेण्यात आले. तिचा भाऊ, कियाराशने पोलिसांना आपल्या बहिणीला याप्रकारे घेऊन जाण्यावर विरोध दर्शवला होता. परंतु, पोलिस म्हणाले की, तिला १ तासासाठी पोलिस स्टेशन घेऊन जात आहोत.
भावाने बहिणीसोबत घडलेली घटना सांगितली
तिचा भाऊ पोलिस ठाण्याच्या बाहेर बहिणीच्या सुटकेची वाट पाहत होता. पण त्याच्या बहिणीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. “या महिलेला मार्गदर्शन आणि शिक्षणासाठी ग्रेटर तेहरान पोलिस कॉम्प्लेक्समध्ये पाठवण्यात आले होते. तेव्हा अचानक, तिला हृदयविकाराचा झटका आला.”
मानवाधिकार आयोगाने दखल घेतली
पोलिसांनी दिलेल्या युक्तिवादाबद्दल विचारले असता, महसाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती पूर्णपणे बरी होती आणि तिला कोणतीही आरोग्य समस्या नाही, ती आमच्यासोबत तेहरानला जात होती. तिला अचानक हृदयविकाराचा झटका कसा आला?
मानवाधिकार संघटना एमनेस्टी इंटरनॅशनलने म्हटलंय, “२२ वर्षीय तरुणी महसा अमिनीचा संशयित मृत्यू ज्या परिस्थितीत झाला, पोलिसांच्या ताब्यात तिला यातना दिल्या गेल्या आणि तिच्यासोबत दुर्व्यवहार झाला, याची फौजदारी चौकशी झाली पाहिजे.