अकोला,दि. 15: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोलाव्दारे ऑगस्ट 2022-23 सत्रासाठी प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वागत समारंभ व मार्गदर्शनाचे आयोजन बुधवारी(दि.14) करण्यात आले. प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी विविध व्यवसायात प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत करुन व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्त्व व व्यक्तीगत शिस्त यांचे महत्त्व विशद केले. त्यानंतर संस्थेविषयी माहिती देऊन गेल्या 65 वर्षापासून दर्जेदार व्यवसाय प्रशिक्षणाचे अविरत कार्य करीत असल्याचे उपस्थितांना सांगितले. संस्थेचे गट निर्देशक कौशलाचार्य मंगेशजी पुंडकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना एनएसक्युएफ अभ्यासक्रम, अभ्यासक्रमात असलेल्या प्रोफेशनल स्कील्स, एम्प्लॉयबिलिटी स्कील्स, तसेच वर्क्समनशिप बाबत सविस्तर माहिती दिली. संस्थेतील सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. बी. घोंगडे यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेतील शिस्त व नियमांबाबत माहिती श्रीमती ताकवाले यांनी तर कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती संस्थेचे कार्यालय अधीक्षकानी दिली. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थी तथा यशस्वी उद्योजक नितीन वराडे, गटनिदेशक रणजीत महल्ले, कौशलाचार्य मंगेश पुंडकर, राजेश धोत्रे, शंतनु वानखेडे, विनय काळे, सी. डी. शेळके, योगेश घुगे तसेच संस्थेतील सर्व शिल्प निर्देशक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे टर्नर निदेशक संदिप पिसे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती देशमुख यांनी केले.