पातूर:- (सुनिल गाडगे) :- आझादी का अमृत महोत्सव व गणेश उत्सवा निमीत्त भव्य कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबीराचे आयोजन प्राथमीक आरोग्य केंद्र पातूर तथा वाय. आर. जी के. आर. संस्था यांच्या संयुक्त विद्यामानाने जय बजरंग गणेश उत्सव मंडळ व स्वर्गीय. पैलवान सोनुभाऊ प्रकाश चावरे गुरुवार पेठ पातूर येथे कोरोणा लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ४५ नागरीकांना कोरोणा लसीकरण (बूस्टर डोज) देण्यात आले यासाठी प्राथमीक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधीकारी डॉ. चिराग रेवाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेवीका हर्षा खडसे मॅडम, DEO रणजित राठोड सर, YRG केअर चे सै. साजिद खान, जय बजरंग गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत, प्रकाशभाऊ चावरे, भिकाजीं नवले, विठ्ठल ढगे, अजय बगाडे, शिवा बोदडे, रवि ढगे, विशाल राऊत, अंकुश मते, सनद गवई, प्रशांतदादा ढगे, जयेश खोडे, सुनील चावरे, अनिल राऊत, गजानन गोल्डे, ओम दाते, शुभम बनकर, दिनेश कल्पंड, पवन सारवाण, आकाश शिंदे, विनोद शिंदे, अमर चंदाले, यांनी कोविड लसीकरण मध्ये सहभाग घेतला.