अकोला (प्रतिनिधी)- ५ सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती शिक्षक दीन म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. अंबादास कुलट च्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. या मध्ये विद्यार्थ्यानं करीता स्वयंशासन उपक्रम राबवण्यात आला. या मध्ये विज्ञान, वाणिज्य व कला या तिन्ही विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गांवर तशिका घेतल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका खूप चांगल्या रीतीने पार पाडली.
स्वयंशासन या उपक्रमात विद्यार्थ्यांचे मूल्यांकनसुद्धा करण्यात आले. या मध्ये महाविद्यालयातून मधून प्रथम क्रमांक थॉमस लाल तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक पलक मोहता, द्वितीय क्रमांक मोहंमद फैक, वाणिज्य मधून प्रथम क्रमांक तेजस्विनी काळने द्वितीय क्र. आनंद पाटील, कला शाखेतून प्रथम क्र.पूजा वानखेडे द्वितीय क्र. पूनित कोल्हे यांनी शिक्षकांची भूमिका बजावून पटकावला अनेक विद्यार्थ्यांनी प्राध्यापक म्हणून वर्गामध्ये तामिका घेतल्या. या नंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षक वर्गासाठी वसंत सभागृह येते सर्व प्राध्यापक वर्गाला पेन व गुलाब देऊन त्यांचा सत्कार केला. महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिय प्राचार्य श्री अंबादास कुलट सर यांना समृद्धी डहाके या विद्यार्थिनीने स्वतः रेखाटलेले त्यांचे चित्र भेट दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य. अंबादास कुलट, प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत झटाले, डॉ.प्रा.अनिल राऊत, डॉ.प्रा.एस.जी.शेंडे, डॉ.प्रा.विवेक.हिवरे, डॉ. प्रा. अंजली. कावरे, डॉ. प्रा. आशिष राऊत व मा.अशोक चंदन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ वाघोडे यांनी केले तर विद्यार्थांना शिक्षकाचे आपल्या जीवनातील महत्त्व या विषयावर मा.चंद्रकांत झटाले यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन धनश्री देशमुख व रोहिणी भोपळे यांनी केले. व आभार प्रदर्शन जिया कोटक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकेत भालेराव,निहाल चौधरी,शुभम पौळ,अखिलेश अनासाने,अभिलाष बडगे,हर्षल पाटील,योगेश घुगे,उज्वल तायडे,क्रितेश अग्रवाल,ओम झामारे, रोहित राऊत,कृष्णा भडांगे,संकल्प गजघाटे, रोहित पाटील,सचिन काळे, शुभम उपरवट,गायत्री भटकर,अभिजित उमेकर,साक्षी ठाकरे,नम्रता भटकर,रोहित चोपडे, वैभव चीमनकर,ऋतुजा लाले इत्यादी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.