तेल्हारा (प्रा. विकास दामोदर )- राजमाता जिजाऊंच्या संस्कारात घडलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय एड. शशिकांतजी पवार यांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय सरचिटणीस दिलीपदादा जगताप, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री राम मुळे यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्हाध्यक्ष श्री सुरेशभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात सोमवार दिनांक 5/9/2022 रोजी सकाळी 11 वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्ह्यातील पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोट महिला मराठा महासंघाच्या तालुका अध्यक्ष पदी सौ मंजुषाताई देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी मुन्ना पाथ्रिकर यांची नियुक्ती करण्यात आली. अकोला तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी ज्ञानेश्वर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. युवक मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री भुषण तिरुख यांची नियुक्ती करण्यात आलीआहे. ह्या प्रसंगी राम मुळे यांनी मराठा महासंघाच्या ध्येयधोरणा विषयी माहिती विषद केली तर जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना गाव तेथे शाखा उघडण्याचे आवाहन केले.
या नियुक्ती सोहळ्याला विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री राम मुळे , जिल्हाध्यक्ष श्री सुरेशभाऊ ठाकरे, जिल्हा संघटक ॲड. अमोल सुर्यवंशी, अकोला तालुका अध्यक्ष ओमप्रकाश काळबांडे, युवक मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष, आदेशभाऊ अंधारे, अकोला तालुका कार्याध्यक्ष, विशाल तायडे, कृष्णराव देशमुख, गजाननराव देशमुख, यश देशमुख, विकी मंगळे तसेच बहुसंख्य पदाधिकारी व मराठा सैनीक मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोला तालुका अध्यक्ष श्री ओम प्रकाश काळबांडे यांनी तर आभारप्रदर्शन युवक कार्याध्यक्ष श्री आदेश अंधारे यांनी केले.