• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील आढावा बैठक: विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे- कृषीमंत्री अब्दुल सत्तार ; ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

Our Media by Our Media
September 3, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
78 0
0
पीकेव्ही बैठक
20
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.3  राज्यातील कृषीविद्यापीठांचे कार्य हे शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे असून विद्यापीठांनी आपले संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे,असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. तसेच सर्व अधिकारी, संशोधक व प्राध्यापकांनीही एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही ना. सत्तार यांनी केले.

येथील डॉ. पंजाबराव देशमुक कृषी विद्यापीठ येथे आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस कुलगुरु डॉ. विलास भाले, विधान परिषद सदस्य आ. विप्लव बाजोरिया, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदय विठ्ठल सरप, श्रीमती अर्चना बारब्दे, विद्यापीठातील अधिकारी वर्ग, विभागप्रमुख, संशोधक व अमरावती विभागाचे कृषी सह संचालक डॉ. किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. आरीफ शाह, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या समोर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची सविस्तर माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले. कृषीमंत्री म्हणाले की, विद्यापीठाने विविध पिकांचे संशोधन करतांना मागणी प्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करावे. संशोधन शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर असणे आवश्यक आहे. चांगल्या वाणांना चालना द्यावी. सेंद्रीय शेतीच्या अनुषंगाने अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रीय उत्पादनांकडे वळावे यासाठी चालना द्यावी. संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. लोकांना अधिक शक्तिदायक अन्न उपलब्ध करुन देणाऱ्या पिकांच्या जाती संशोधित कराव्या. आदिवासी क्षेत्रातील दुर्लभ पिकांच्या जातींचा विकास करावा. आदिवासी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आदिवासी क्षेत्रातच व्यवस्था करावी., शेतीच्या सिंचनासाठी जलस्त्रोतांचे बळकटीकरण करावे. विद्यापीठाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी पदभरतीला प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी आवश्यकतेच्या प्राधान्यक्रमानुसार पदभरती करण्याबाबत शासन पावले उचलेल असेही ना. सत्तार यांनी सांगितले.

कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या कुलगुरुपदाच्या कारकीर्दीचा अखेरचा दिवस असल्याने त्यांचा सत्कारही कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. किशोर बिडवे यांनी सुत्रसंचालन केले. तत्पूर्वी कृषीमंत्र्यांनी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध वाण व उत्पादनांच्या प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली.

Previous Post

महाबीज येथील आढावा बैठक :शेतकऱ्यांचा विश्वासाची जपणूक करु- कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; लम्पी चर्मरोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्र नियंत्रीत घोषीत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; लम्पी चर्मरोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्र नियंत्रीत घोषीत

India

ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत भारत बनला जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.