LPG Cylinder Price : गणेशोत्सवाच्या (Ganeshostav 2022) काळात भक्तांना मोठं गिफ्ट मिळाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात मोठी घट झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या (Commercial Gas Cylinder ) दरात मोठी कपात करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी 1 सप्टेंबर म्हणजे आजपासून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती 91.5 रुपयांनी कमी केल्या आहेत. तर दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर 91.5 रुपयांनी कमी झाले आहेत त्यामुळे गणेशोत्सवामध्ये सर्वसामान्यांसाठी हे मोठं गिफ्ट मानले जात आहे. इंडियन ऑइलने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या नव्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा कमर्शियल गॅस सिलेंडर 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून या सिलेंडरसाठी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हा सिलेंडर 1976.50 रुपयांना विकत घ्यावा लागत होता. कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्यामुळे व्यावसायिक, रेस्टॉरंट मालक, हॉटेल मालक यांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिंलेडरचे दर कमी केले आहेत पण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात (Domestic Gas Cylinder Price) काहीच बदल केला नाही.