अकोला -: प्रती -: आपल्या न. प कार्यालय मार्फत जुने ग्रामीण रुग्णालय जवळ वाचनालय बांधलेले असून त्यांचे उद्घाटन दिनांक २१/०८/२०२१ रोजी झालेले आहे. परंतु अद्याप पर्यंत सदर वाचनालय विद्यार्थी करिता सुरू करण्यात आलेले नाही.
त्यामुळे बाळापूर शहरातील विद्यार्थीचे व शाळकरी मुलांचे नुकसान होत आहे सदर वाचनालय बंद असल्यामुळे बरेच विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवार हे पैसे खर्च करून बाहेरगावी जसे अकोला येथे वाचनालय मध्ये जात आहे तसेच सदर वाचनालय मध्ये वाचण्याकरिता पुस्तके व कोणत्याही प्रकारचे फर्निचर उपलब्ध नाही. तसेच ज्या विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नाही त्यांना विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे व ते शिक्षणापासून वंचित राहत आहे.
तरी आपणास नम्र विनंती आहे की सदर वाचनालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावे जेणेकरून सदर वाचनालयांमध्ये पुस्तके फर्निचर व इतर साहित्य उपलब्ध करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे व स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे उमेदवार यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही सदर वाचनालय लवकरात लवकर सुरू न केल्यास अशोका फाउंडेशन बाळापुर व अनेक विद्यार्थी यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दक्षता घ्यावी अशी मागणी अशोका फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम तिडके यांनी बाळापूर नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदन देताना अशोका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके मनीष तायडे, पंकज तायडे विठ्ठल ठोंबरे, हितेश वाडेकर, शुभम सुरडकर ,पंकज उमाळे, श्रीराम भारसाकडे, अजय शिरसाट, शुभम हसुलकर, अनुराग तायडे, राज तायडे, गौतम सावदेकर, इत्यादीच्या सह संपूर्ण विद्यार्थी उपस्थित विद्यार्थिनी होते.