राज्यातील महाविद्यालयांतील प्राचार्यांच्या रिक्त जागा व आठ हजारांपैकी 2072 प्राध्यापक पदाची लवकरच भरती केली जाईल. याबाबतचे आदेश काढले असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली. कोल्हापूर दौर्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.z
मंत्री पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठास सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त जाहीर केलेले 50 कोटी रुपयांपैकी दहा कोटी मिळाले. उर्वरित 40 कोटी रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डिसेंबरच्या पुरवणी मागणीत याचा समावेश करून टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. शालेय स्पर्धा दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत, या प्रश्नावर बोलताना मंत्री पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी आपण चर्चा करू, असे सांगितले. खेळाडूंचा सराव सुरू करून डिसेंबरमध्ये स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करायला सांगू.
मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्रात हे सरकार येण्यापूर्वी केंद्राकडून भाजपचा खासदार नसलेल्या 144 मतदारसंघाची निवड केली आहे. याठिकाणी व्यवस्थित लक्ष दिले तर भाजपचा खासदार निवडून येऊ शकतो.