• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा बाल संरक्षण समितीची बैठक ‘पॉक्सो कायद्या’ची जनजागृती करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
August 31, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
जिल्हा बाल संरक्षण समिती आढावा (
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.31:- बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी ‘पोक्सो’ कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याची माहिती शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच जनसामान्य नागरिकांना व्हावा याकरीता जिल्हा व ग्रामस्तरावर प्रशिक्षण, कार्यशाळा व जनजागृती मोहिम राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.

जिल्हा बाल संरक्षण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू गुल्हाने, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, बाल कल्याण समिती सदस्य डॉ. विनय दांदळे, प्रांजली जयस्वाल, शिला तोष्णीवाल, बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. वैशाली गावंडे, सारीका गिरवडेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, पॉक्सो कायद्याविषयी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हा व तालुकास्तरावर प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करा.बालगृहातील बालकांचे आधार नोंदणी करुन त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून द्या. तालुका संरक्षण अधिकारी यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या भिक्षेकऱ्यांचे सर्वेक्षण तातडीने पुर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बालगृहातील पात्र १२ ते १८ वयोगटातील बालकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण करण्यात आले आहे. बालगृहातील बालकांची जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नियमित आरोग्य तपासणी, लैंगिक आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात येते. चाईल्‍ड लाईन व बाल संरक्षण कक्षाच्या मदतीने हरविलेल्या मुलांच्या शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी यावेळी सादर केली.

Previous Post

विशेष लेखः- जनावरांतील लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

Next Post

जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती; जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
जादूटोना विरोधी कायदा समिती (2)

जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती; जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा

Chandrakant Patil : राज्यातील प्राचार्यांच्या रिक्‍त जागा , 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी

Chandrakant Patil : राज्यातील प्राचार्यांच्या रिक्‍त जागा , 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.