• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, January 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Ganesh Pratishthapana Puja: गणेश चतुर्थी २०२२ श्री गणेश प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा

Our Media by Our Media
August 30, 2022
in Featured, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 2 mins read
76 3
0
Ganesh Chaturthi 2022
28
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Ganesh Pratishthapana Puja : बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वांकडे गुरुजी येऊ शकतीलच असे नाही. त्यामुळे खास आपल्यासाठी श्री गणेश प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा घेऊन आलो आहोत.

मंगलकार्य किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत असून, पार्थिव गणपती पूजनाचा शुभ मुहूर्त दुपारी ३.२३ वाजेपर्यंत आहे. सध्याच्या एकूणच परिस्थितीत सर्वांकडे गुरुजी येऊ शकतीलच असे नाही. त्यामुळे खास आपल्यासाठी संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा (मंत्रोच्चारासहित) घेऊन आलो आहोत. श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना अशी करावी…

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.

गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.

Ganesh Chaturthi 2022

 प्राणप्रतिष्ठेचा मंत्र

अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।

अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।
रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।
पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।
बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।
देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।

अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्रीगणेशांना नमस्कार करून…

एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।
पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।।
ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।
चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।।
दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।
मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।।

हे श्लोक म्हणत असताना अंत:करणात श्रीगणेश मूर्तीचे ध्यान करावे.

– आवाहन मंत्र

आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।

असे म्हणून मूर्तीला आवाहन सूचक अक्षता अर्पण कराव्यात.

विचित्र रत्नरचितम् दिव्यास्तरण संयुतम्।
स्वर्णसिंहासनम् चारु गृहाण सुरपूजित।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षताम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात.

सर्वतीर्थ समानीतम् पाद्यम् गंधादि संयुतम्।
विघ्नराज गृहाणेदम् भगवन् भक्तवत्सल।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पादयो: पाद्यम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

– अर्घ्य मंत्र

अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।
गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।

असे म्हणून पळीभर पाण्यात गंध , अक्षता , पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने , अर्घ्य म्हणून श्रीगणेशांना अर्पण करावे.

– आचमन मंत्र

विनायकम् नमस्तुभ्यम् त्रिदशैरभि वंदित।
गंगाहृतेन तोयेन शीघ्रम आचमनम् कुरु।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आचमनियम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे.

गंगादि सर्वतीथेर्भ्य आनीतम् तोयमुत्तम्।
भक्त्या समपिर्तम् तुभ्यम् स्नानाय आभिष्टदायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। स्नानम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

– पंचामृत स्नान मंत्र

पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।
पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना फुलाने पंचामृत (पंचामृत म्हणजे दूध, दही, तुप, साखर आणि मध) अर्पण करावे. नंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. या वेळी सुगंधी अत्तर, गरम पाणी अर्पण करावे.

पंचामृत अर्पण केल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवावा. यानंतर उत्तर दिशेला सुरुवातीला वाहिलेली फुले, अक्षता म्हणजेच निर्माल्य विसर्जित करावे. यानंतर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा.

– वस्त्र मंत्र

रक्तवस्त्रयुगम् देव दिव्यम् कांचनसंभवम्।
सर्वप्रदम् गृहाणेदम् लंबोदर हरात्मज।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। वस्त्रम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना वस्त्र अर्पण करावे.

– यज्ञोपवीत मंत्र

राजतम् ब्रह्मासूत्रम् च कांचनम् चोत्तरीयकम्।
गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानाम् वरदो भव।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।

जानवे श्रीगणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे.

– चंदन मंत्र

कस्तुरीरोचना चंदकुंकुमैश्च समन्वितम्।
विलेपनम् सुरश्रेष्ठ चंदनम् प्रतिगृह्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। चंदनम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांच्या मस्तकाला चंदन लावावे.

– अक्षता मंत्र

रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन।
ललाटपटले चंदस्तस्योपरि विधार्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अक्षताम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना अक्षता अर्पण कराव्यात.

– पुष्प मंत्र

माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो।
मयाहृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।

असे म्हणून अनेक प्रकारची फुले , दुर्वा , शमी व अन्य पत्री श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.

– धूप मंत्र

दशांगम् गुग्गुलम् धूपम् सुगंधम् च मनोहरम्।
गृहाण सर्वदेवेश उमापुत्रम् नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।

असे म्हणून डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावे.

– दीप मंत्र

सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापह।
गृहाण मंगलम् दीपम् रुद्रप्रिय नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।

असे म्हणून निरांजनाने श्रीगणेशांना ओवाळावे.

– नैवेद्य मंत्र

नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।
ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना नैवेद्य दाखवावा.

– विडा मंत्र

पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम्‌ ।
कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्‌ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पूगीफल तांबुलम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना विडा अर्पण करावा.

Tags: ganesh chaturthiGanesh Pooja
Previous Post

अकोला सर्वोपचार रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये -आमदार सावरकर यांचा इशारा

Next Post

दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
पंडीत दीनदयाल उपाध्याय

दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

Ganesh

मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशयात गणेश मुर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.