अकोला दि.२7 :- गणेशोत्सवात स्थापन करावयाच्या गणेश मुर्तिंच्या उंचीवर कोणतेही निर्बंध नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार गणेश उत्सवानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये दिलेल्या निर्देशानुसार गणेश मुर्तीच्या उंचीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत. तसेच संबंधित महानगरपालिकेमार्फत गणेश मंडळाना आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क आकारण्यात येऊ नये. तसेच गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश संबंधीत विभागांना देण्यात आलेले आहे. महानगरपालिकास्तरावर परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेशघाट बाळापूर मध्ये व मिरवणूक मार्गावर आवश्यक सोई सुविधा पुरविण्यात याव्यात अशा सुचना जिल्हाधिकारी नीमा अरोरा व जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संबंधीत विभागांना दिल्या आहेत.