• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

5G Services Launch Date: 5G सेवा कधी सुरू होणार? आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Our Media by Our Media
August 26, 2022
in Featured, तंत्रज्ञान, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
74 4
0
5G Services
13
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Telecom Sector : मागील काही दिवसांपासून सर्वजण 5G दूरसंचार सेवांबद्दल चर्चा करत आहेत. देशभरात नवी आधुनिक 5G दूरसंचार सेवा (5G telecom service) कधी सुरू होणार याबद्दल उत्सुकता आहे. आता 5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून दूरसंचार कंपन्यादेखील तयारीत आहेत. त्यामुळे देशात 5G मोबाइल सेवा सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav)यांनी मोठी माहिती दिली आहे. लवकरच ही सेवा देशातील सर्व शहरांमध्ये उपलब्ध होईल.

मागील काही दिवसांपासून सर्वजण 5G दूरसंचार सेवांबद्दल चर्चा करत आहेत. देशभरात नवी आधुनिक 5G दूरसंचार सेवा (5G telecom service) कधी सुरू होणार याबद्दल उत्सुकता आहे. आता 5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून दूरसंचार कंपन्यादेखील तयारीत आहेत. त्यामुळे देशात 5G मोबाइल सेवा सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav)यांनी मोठी माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात देशात 5G मोबाइल सेवा सुरू होईल. खरंतर अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत देशात 5G मोबाइल सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर ही सेवा देशातील सर्व लहान आणि मोठ्या शहरांमध्ये विस्तारित केली जाईल. त्यामुळे 5G सेवांबद्दलची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. (Union Minister Ashwini Vaishnav told date of 5G launch)

केंद्रीय मंत्र्यांनी 5G बद्दल दिली माहिती

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की 5G सेवा ही सर्वसामान्यांना परवडणारी आहे याची आम्ही खातरजमा करू. म्हणजेच प्रत्येक स्तरावरील ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, “आम्ही येत्या दोन ते तीन वर्षांत 5G सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध होण्याची अपेक्षा आम्हाला आहे. 5G मोबाईल सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दूरसंचार कंपन्या या दिशेने काम करत असून इन्स्टॉलेशनचे काम सुरू आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू होईल आणि त्यानंतर देशभरातील शहरे या सेवेशी जोडली जातील.

स्पेक्ट्रमसंदर्भात सुसंवाद आवश्यक

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, ‘5G सेवांसाठी स्पेक्ट्रम हार्मोनायझेशन प्रक्रिया म्हणजे स्पेक्ट्रम सुसंवादाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. या अंतर्गत, सर्व दूरसंचार सेवा कंपन्यांच्या संमतीने एका बँडमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओ लहरींचा समूह एका संलग्न ब्लॉकमध्ये आणला जातो. स्पेक्ट्रम हार्मोनायझेशनमुळे कंपन्यांची कार्यक्षमता वाढते कारण ते त्यांच्यासाठी उपलब्ध रेडिओ लहरींचा भाग एकाच बँडमध्ये एकत्र आणतात. हे काम कंपन्यांच्या संमतीने केले जाते.

सरकारला दीड लाख कोटी रुपयांचा महसूल

देशातील दूरसंचार स्पेक्ट्रमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव या काही दिवसांपूर्वी पूर्ण झाला. 4.3 लाख कोटी रुपयांचे एकूण 72 GHz स्पेक्ट्रम विकून सरकारला 1.5 लाख कोटी रुपयांची विक्रमी बोली मिळाली. यामध्ये 51,236 मेगाहर्ट्झ म्हणजेच 71 टक्के स्पेक्ट्रम विकले गेले. तुमच्या माहितीसाठी लिलावाच्या पहिल्याच दिवशी सरकारला मोठा नफा झाला होता.

भारातत सध्या तीन कंपन्या 5G सेवा पुरवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यात jरिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या त्या तीन कंपन्या आहे. यापैकी जिओ कंपनीकडून सर्वप्रथम ही सेवा पुरवायला सुरुवात होईल, अशी चिन्हे आहे. 5G स्पेक्ट्रमच्या खरेदीत रिलायन्स ही सर्वात मोठी कंपनी होती.

Previous Post

तेल्हारा तालुक्यात सोयाबीन पिकांवर किड, शेतकरी हतबल

Next Post

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा; उद्धव ठाकरेंसोबत निवडणुका लढणार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
UDDHAV-SAJEB

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा; उद्धव ठाकरेंसोबत निवडणुका लढणार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पोळा उत्साहात साजरा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पोळा उत्साहात साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.