अकोला,दि.26 :- अकोला तालुक्यातील मौजे निपाना याठिकाणच्या जनावरामध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. त्या अनुषंगाने या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेवून संक्रमण व सांसंर्गिक रोप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार प्राप्त अधिकारा नुसार मौजे निपाना या संसर्गकेंद्रापासून 10 किलोमिटर बाधित क्षेत्र घोषीत केल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकिकरण करुन 10 किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करणास प्रतिबंध घालण्यात येत आहे. तसेच जिल्हा पशुसवंर्धन विभागाने प्रादुर्भाव भागातील पाच किमी परिघातील जनावरांना गोट पोक्स लसीकरण तात्काळ करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.