• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक गणेशोत्सवः सद्भाव, सुरक्षा आणि सामंजस्याचा

Our Media by Our Media
August 25, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
77 1
0
प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक गणेशोत्सवः सद्भाव, सुरक्षा आणि सामंजस्याचा
22
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 25 :  यंदाचा गणेशोत्सव साजरा करतांना सद्भाव, सुरक्षा आणि परस्पर सांमजस्य जोपासून उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असा सूर जिल्हा प्रशासन व सार्वजनिक गणेशोस्तव मंडळांच्या संयुक्त बैठकीत निनादला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन भवनात ही बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते, महावितरण अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, अन्य विभागांचे प्रमुख अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष ॲड, मोतिसिंग मोहता, सचिव सिद्धार्थ शर्मा तसेच मंडळांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बैठकीत प्रारंभी विविध विभागांमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली. महानगरपालिकेने मंडळांना द्यावयाच्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरु करावी. मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवावे. पोलीस विभागाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यवाही करावी. गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदुषण होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत नियमांचे पालन व्हावे. रात्री १० वा. नंतर ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक वापरता येणार नाही. तथापि, या कालावधीत गणेशोस्तवाचा दुसरा दिवस(गुरुवार दि.१ सप्टेंबर), पाचवा दिवस(रविवार दि.४ सप्टेंबर), गौरी विसर्जन(सोमवार दि.५ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी (शुक्रवार दि.९ सप्टेंबर) हे चार दिवस ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास रात्री १२ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोहता व सचिव सिद्धार्थ शर्मा तसेच विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही काही सुचना केल्या.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले की, पोलीस विभाग कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहे. सार्वजनिक मंडळांनी आपल्यास्तरावर स्वयंसेवकांची सुरक्षा व्यवस्था ठेवावी. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.पोलीसांतर्फे दामिनी पथक हे सज्ज असेल. तसेच नियमित बंदोबस्त असेलच.सुरक्षेची उपाययोजना म्हणून सार्वजनिक मंडळांच्या मंडपाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात येईल, त्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी गणेशोत्सवात सुधारणांना वाव असावा. शक्यतोवर पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा. कायद्याचे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

Previous Post

विशेष लेख :-देशी वळू संगोपनाच्या संकल्पाने साजरा करू बैलपोळा

Next Post

जळगाव येथे होणार बामसेफचे राज्य अधिवेशन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
जळगाव येथे होणार बामसेफचे राज्य अधिवेशन

जळगाव येथे होणार बामसेफचे राज्य अधिवेशन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी-निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी-निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.