Mumbai Breaking News : मुंबईकरांसाठी ही बातमी अतिशम महत्त्वाची असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण, रायगडनंतर आता मुंबईत धोका वाढत आहे. मुंबई पोलिसांना आलेल्या एका मेसेजमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथं दोन संशयास्पद बोट आढळून आल्यानंतर आता राज्यासाठी आणखी एक धोकादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला भारताबाहेरच्या एका नंबरवरून दहशतवादी हल्ला होण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई सध्या अलर्ट मोडवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात यामुळे खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांना ही धमकी देण्यात आली आहे. भारताबाहेरच्या नंबरवरून हे मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले आहेत.
या नंबरला ट्रॅक करण्यात येत असून यामुळे संपूर्ण पोलीस विभाग अलर्टवर आहे. मेसेजकर्त्याने सांगितले की, जर तुम्ही त्याचे लोकेशन ट्रेस केले तर ते भारताबाहेर दिसेल आणि स्फोट मुंबईत होणार आहे. या धमकीमध्ये असंही लिहण्यात आलं आहे की, भारतात ६ लोक हे काम पार पाडणार आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये २६/११ सारखा हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून या धमकीची माहिती देण्यात आली. या दहशतवादी धमकीने मुंबईसह देशाचं टेन्शन वाढवले आहे. मुंबईला उडवून देण्याची धमकी पाकिस्तानातून आली आहे.