अकोला (प्रती) – अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे व शहराच्या ठिकाणीग्रामीण भागातील गोर गरीब लोकांना वेळेवर उपचार मिळावा म्हणून ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
या ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याच प्रमाणात रुग्णांची हेळसांड होत आहे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका कर्मचारी उपस्थित नसतात रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. यामुळे गोरगरीब रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा या गैर प्रकारामुळे बऱ्याच लोकांचे मृत्यू झाले आहेत. हा प्रकार त्वरित थांबवण्यात यावा अन्यथा परिवर्तन स्वाभिमानी संघटना तीव्र आंदोलन छडेल अशी मागणी परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र सचिव सतीशभाऊ तेलगोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.