बाळापुर(पंकज इंगळे )- वंचित बहुजन आघाडी बाळापूर तालुक्याच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार मा. जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 12/08/2022रोजी अकोला जिल्हाधिकारी यांच्या कार्यलयावर होणाऱ्या धडक मोर्च्या संबंधी बाळापूर येथील पं. स. सभागृहात बैठक संपन्न झाली.
या बैठकींमध्ये मा. प्रमोदभाऊ देंडवे, पं.स. सभापती रुपाली ताई गवई,गजानन गवई मा. गटनेते महानगर पालिका अकोला, मिलिंदभाऊ इंगळे,जि.प्रवक्ता.धर्मेंद्र दंदी,जि.प.सदस्य रामभाऊ गव्हाणकर,जेष्ठ नेते शामलालजी लोध, मा.सभापती देवानंद अंभोरे, निरंजन सिरसाट, बबलूभाऊ सिरसाट, चंदू भाऊ दांडगे पं.स. सदस्य निलेश इंगळे, अफसर भाई,डोंगरे साहेब, उगले भाऊ,रामकृष्ण सोनटक्के, राजकन्या ताई कवळकार, महिला आघाडी अध्यक्ष त्रिगुणाताई शेंडे, इंदुबाई वानखडे, सविताताई वानखडे, मंगेश गवई, संजय उमाळे, गुलाब उमाळे, गणेश सुरजुसे,धम्माभाऊ तायडे,सुबोध डोंगरे, मनोज गवई, रामराव सावळे, अतुल दांडगे , अमोल वानखडे संदीप दामोदर, पंजाबराव दामोदर, अमोल तेलगोटे, आकाश सावळे,मनोज दंदी, राजेश दंदे,नागेश डोंगरे,शेख यासिन कुरेशी,संजुभाऊ वाकोडे, विठ्ठल राऊत तसेच पक्षाचे सर्व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान सावदेकर यांनी तर आभार प्रदर्शन सुहास इंगळे यांनी केले. जि.प.व.पं.स.पदाधिकार्यांनी आपल्या सर्कल मधील जास्तीत जास्त शेतकरी व अतिक्रमण धारक मोर्चात सहभागी करा असे आव्हान त्यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केले.