इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनीच्या (Management Trainee) ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी २ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत असून अर्ज आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट आहे. इच्छुक उमेदवार ibps.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंड बँक, यूको बँक आणि यूनियन बँक आदी बँकांमध्ये ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ६,४३२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रिलिमनरी परीक्षा (preliminary exam) ऑक्टोबरमध्ये होणार आहे. तर निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर होईल. IBPS कडून लवकरच अंतिम तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.
BPS द्वारे जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण ६४३२ पदांची भरती केली जाईल. या रिक्त पदासाठी अर्जाची लिंक उद्यापासून अॅक्टीव्ह केली जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २२ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
अर्ज कसा कराल?
१. अर्ज दाखल करण्यासाठी सर्वप्रथम ibps.in या संकेतस्थळाला भेट द्या.
२. संकेतस्थळाच्या होमपेजवर CAREER NOTICES या लिंकवर क्लिक करा.
३. यानंतर IBPS PO / MT XII Online Form 2022 for 6432 Post या लिंकवर क्लिक करा.
४. पुढे Apply Here या पर्यायावर क्लिक करा.
५. विचारण्यात आलेली सर्व माहिती भरुन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
६. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जाचा फॉर्म भरता येईल.
७. अर्ज दाखल केल्यानंतर अॅप्लीकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायला विसरू नका.
कोण-कोणत्या बँकेत मिळेल नोकरी?
- बँक ऑफ इंडिया- ५३५ जागा
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया- २५०० जागा
- पंजाब नॅशनल बँक- ५०० जागा
- पंजाब अँड सिंध बँक- २५३ जागा
- यूको बँक- ५५० जागा
- युनियन बँक ऑफ इंडिया- २०९४ जागा
कोण करू शकतं अर्ज?
IBPS ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, PO च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, उमेदवारांना अधिसूचना वाचावी लागेल. उमेदवारांच्या वयोमर्यादेबाबत बोलायचं झालं तर प्रोबेशनरी ऑफिसरच्या (PO) पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.