• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय पशुधन अभियान; मुरघास निर्मितीकरिता सायलेज बेलर मशीन युनीटकरीता अर्थ सहाय्य

Our Media by Our Media
August 2, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
90 1
0
पशुधन
14
SHARES
650
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.2 राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत मुरघास निर्मितीकरिता सायलेज बेलर मशीन युनीट स्‍थापनेसाठी अर्थ सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. ही योजना अनुसुचित जाती उपायोजना प्रवर्गातील संस्थानाकरीता राखीव असून या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.

राष्ट्रीय पशुधन योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्ह्यासाठी एक युनिटचा लक्षांक असुन प्रती युनिट 20 लक्ष खर्चापैकी 10 लक्ष केंद्र शासनाचे अर्थ सहाय्य असुन उर्वरित 10 लक्ष संस्‍थेने स्‍वत: खर्च करायचे आहे. योजनेचा लाभ जिल्ह्यातील सहकारी दुध उत्‍पादक संघ/संस्‍था, शेतकरी उत्‍पादक कंपनी/संस्‍था, स्‍वयं सहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्‍था यांच्याकरीता आहे. योजनेसाठी संस्‍थेची निवड करताना याच प्राधान्य क्रमाने निवड करावयाची आहे. जिल्ह्यातील एकाच संस्‍थेला या योजनेचा लाभ द्यावयाचा आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

मुरघास निर्मिती करिता सायलेज बेलर मशीन युनिटमध्‍ये सायलेज बेलर, हेवी ड्युटी कडबा कुटी यंत्र, (क्षमता किमान 2 मे.टन प्रति तास) टॅक्‍टर व ट्रॉली, वजन काटा, हार्वेस्‍टर, मशीन शेडवरील पैकी सायलेज बेलर व हेवी ड्युटी कडबा कुटी यंत्र या मशीनरीची खरेदी करणे आवश्‍यक असून 20 लक्षपैकी उर्वरीत शिल्‍लक निधीतुन संस्‍थेच्या आवश्यकतेनुसार इतर बाबींसाठी निधी खर्च करता येईल. ही योजना अनुसुचित जाती उपयोजना प्रवर्गातील संस्थांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा निधी थेट लाभ हस्‍तांतरण( डि.बी.टी.) व्दारे अदा करण्‍यात येईल. संस्‍थेने आवश्यक मशिनरीची खरेदी केल्‍यानंतर संस्‍थेच्‍या बँक खात्यात निधी जमा करण्‍यात येईल. योजनेच्‍या जिल्‍हास्‍तरीय राष्ट्रीय पशुधन अभियान समितीमार्फत प्राप्‍त प्रस्‍तावामधुन योजनेच्‍या लाभासाठी संस्‍थेची निवड करण्‍यात येईल. योजनेच्‍या लाभासाठी निवड करण्‍यात येणाऱ्या संस्‍थेची 10 लक्ष निधी खर्च करण्‍याची आर्थिक क्षमता असल्‍याबाबत खात्री करण्‍यात येईल. यासाठी प्रस्‍तावासोबत संस्‍थेचा मागील तीन वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल असणे आवश्‍यक आहे. संस्‍थेच्‍या स्‍वहिस्‍सा निधीकरिता संस्‍था स्वनिधितून खर्च करू शकेल अथवा आवश्‍यकतेनुसार बँकेकडुन कर्ज घेवू शकेल. बँकेकडुन कर्ज घेतल्‍यास कर्जाची परतफेड करण्‍याची संपुर्ण जबाबदारी संबंधित संस्‍थेची असेल. योजनेमधुन खरेदी केलेल्‍या मशिनरीची शासनाच्या संमती शिवाय परस्‍पर विक्री करता येणार नाही. यासाठी संस्‍थेस पाचशे रुपयांच्या मुद्राकावर रितसर करारनामा करून द्यावा लागेल. तसेच पशुसंवर्धन विभागाव्दारे योजनेमधून खरेदी करण्यात आलेली मशिनरी दाखवणे बंधनकारक असेल.

मुरघास निर्मितीकरीता कच्‍च्‍या मालाचे(हिरवी वैरन) उत्‍पादन अथवा खरेदी, मजूरी खर्च व इतर अनुषंगिक खर्च संस्‍थेला स्वत: खर्च करावा लागेल. अधिक माहितीकरीता जिल्हा पशुसंवर्धन विभाग किंवा संबंधित तालुक्‍याच्‍या पशुधन विकास अधिकारी(विस्‍तार) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 ऑगस्ट रोजी: 224 पदांच्या भरतीचे नियोजन

Next Post

संवाद उपक्रम; सहायक आयुक्तांनी वसतीगृहात केला मुक्काम विद्यार्थ्यांच्या जाणून घेतल्या समस्या

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
सामाजिक न्याय

संवाद उपक्रम; सहायक आयुक्तांनी वसतीगृहात केला मुक्काम विद्यार्थ्यांच्या जाणून घेतल्या समस्या

शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची तारीख वाढवावी, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची मागणी

शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची तारीख वाढवावी, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.