अकोला दि.2: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वय वर्षे 18 ते 59 या वयोगटातील लाभार्थ्यांना बुस्टर डोसचे मोफत लसीकरण करणे सुरु आहे. कमी लसीकरण झालेल्या तालुक्यात नियोजन करुन लसीकरणचा वेग वाढवा,असे निर्देश जिल्हाधिकार निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
जिल्हा कृतीदलाच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, लसीकरण अधिकारी डॉ. मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
कमी लसीकरण असलेल्या ठिकाणी लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. याकरीता लसीकरण व बुस्टर डोस बाबत जनजागृती करावी. फ्रन्ट लाईन वर्कस यांचे लसीकरण पुर्ण करुन घ्यावे. याकरीता तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा. तसेच जिल्हा व तालुक्यातील सर्व बँक कर्मचारी व त्यांचे कुटूंबाचे लसीकरण करुन घ्यावे. लसींच्या उपलब्धतेनुसार लसींचे डोसची मागणी नोंदविणे, प्रत्येक गावात लसीकरण आयोजित करणे, महापालिका क्षेत्रातही लसीकरण सत्र आयोजित करावे. लसीकरण सत्रांच्या आयोजनांची माहिती विविध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.