अकोला- दि २६.०७.२०१२ रोजी रात्री पोलीस नियंत्रण कक्ष मुंबई दक्षिण यांना २०.३० वा मोबाईल फोन क्रमांक ९२८९८१६७६८ या मोबाईल फोन क्रमांकावर फोन धारकाने अकोला पुर्णा एक्सप्रेस मध्ये तसेच खासदार श्री. संजय धोत्रे यांचे घरी बॉम्ब स्फोट होणार आहे. अशी माहीती दिली सदर माहीती पोलीस नियंत्रण कक्ष अकोला येथे प्राप्त होताच पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राउत व उपविभागीय पोलीस अधीकारी सुभाष दुधगांवकर तसेच स्थानिक गुन्हे शाखा, अकोला प्रमुख संतोष महल्ले विशेष पोलीस पथक प्रमुख विलास पाटील पोलीस स्टेशन रामदास पेठ पोलीस निरीक्षक शेळके पोलीस स्टेशन सिव्हील लाईन पोलीस निरीक्षक मडावी तसेच इतर अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी तात्काळ रेल्वे स्टेशन अकोला तसेच खासदार श्री. धोत्रे सा यांचे निवास स्थानी पोहचवुन अकोला रेल्वे स्टेशन येथे उभी असलेली पुर्णा एक्सप्रेस मधील पुर्ण रेल्वे गाडीची तसेच रेल्वेत बसलेल्या प्रवासी यांची चेकींग करुण रेल्वेत बॉम्ब नसल्याचे खात्री केली तसेच खासदार श्री. धोत्रे साहेब यांचे निवासस्थानाचे सुध्दा चेकींग करून बॉम्ब नसल्याचे खात्री करून दोन्ही ठिकाणी सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
सदर माहीती सार्वजनिक शांतता बिघडविण्याचे उद्देशाने जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याची अफवा फसरविल्या बाबत अज्ञात इसमां विरुद्ध पोलीस स्टेशन सिव्हील लाईन येथे सर तर्फे पोहेकॉ विजय पंडीत व नं १४६४ ज्यांनी लेखी रीपोर्ट दिल्याने कलम १८२,५०५, (i) (b) भादंवि प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद करूण नमुद अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता मोबाईल फोन क्रमांक ९२८९८१६७६८ या मोबाईल फोन वरून फोन करणारा अज्ञात आरोपी हा नितीन दिलीप गोटुकले वय ३२ वर्षे रा. बाभुळगांव जहागीर ह.मु. नाशिक आशिर्वाद – ४ भिमडोंगरी शिर्डी नगर नालासोपारा असे निष्पन्न झाल्याने त्यास दि २८.०७.२०१२ रोजी वि. न्यायालयाचे आदेशाने अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधिक्षक मॅडम श्रीमती मोनिका राउत यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी सुभाष दुधगांवकर पोनि. श्री भानुप्रताप मडावी, पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, अकोला यांनी केली आहे.