अकोला दि.26: साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळला चालु आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेतर्गत 75 व बिज भांडवल योजनेअंतर्गत 20 उद्दीष्टे प्राप्त झालेले आहे. त्याअनुषंगाने बीजभांडवल योजनेअंतर्गत 50 हजार ते 7 लक्षापर्यंत आर्थिक सहाय दिल्या जाते. त्यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह 20 टक्के व लाभार्थीचा 5 टक्के तर बँकेच्या कर्जाचा सहभाग 75 टक्के असतो. महामंडळाच्या बीजभांडवल रक्कमेवर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येतो व बँकेचा कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याजदर असतो. अनुदान योजनेअंतर्गंत 50 हजारपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येतात. त्यामध्ये महामंडळाचे 10 हजार रुपये अनुदान तर उर्वरित कर्ज बँकेचे असते.
पात्रता : लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीपैकी असावा, वयोमर्यादा 18 ते 50 असावी, कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईजचा फोटो, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, घरटॅक्स पावती, कोटेशन, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा इ. आवश्यक कागदपत्रासह साहित्यरत्न अण्णाभाऊ विकास महामंडळ मर्या, कौलखेड रोड, नालंदा नगरच्या बोर्डजवळ, आरोग्य नगर चौक, अकोला येथे कार्यालयीन वेळेत अर्ज कराव, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक एस.व्ही. राचर्लावार यांनी केले.