सरकारी नोकरी लागताच पत्नीने पतीला ओळखण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पीडित तरूणाने पत्नीवर फसणुकीचा आरोप केला आहे. जिच्या नोकरीसाठी आपण 15 लाख रुपये खर्च केले तिनेच आता ओळखण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर न्यायासाठी दारोदारी भटकंती करत आहे.
पीडित तरूणाने सांगितले की, आमच्या दोघांची भेट विमानतळ मैदानावर झाली होती. येथे आम्ही प्रॅक्टिससाठी येत होतो. त्यावेळी आपली पत्नी बिहार पोलीस दलाच्या भरतीसाठी तयारी करत होती तर, मी भारतीय लष्कराची तयारी करत होतो. यादरम्यान आमचे एकमेकांवर प्रेम जडले त्यानंतर आम्ही लग्न केले.
लग्नानंतर काही दिवसांनी पत्नीला बिहार पोलिसात नोकरी लागली. नोकरी मिळताच तिने मला पती म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. माझ्या पत्नीचे बदललेले रूप बघितल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एवढेच नव्हे तर, पत्नीने माझा नंबरही ब्लॉक केला आहे.
सरकारी नोकरी लागल्यानंतर पती म्हणून ओळखण्यास नकार दिल्यानंतर संबंधित पीडित तरूण न्यायासाठी दारोदारी भटकत असून, अद्यापपर्यंत त्याला न्याय मिळालेला नाही. या दोघांच्याही लग्नावेळी मुलाचे आणि मुलीचे कुटुंबीय उपस्थित होते. मात्र, आता आमचा या लग्नावर विश्वास नसल्याचे मुलीचे म्हणणे आहे.