अकोला, दि.19 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. मार्फत अनुदान योजना व बीज भांडवल योजना विविध बॅंकांमार्फत राबविल्या जातात. अकोला कार्यालयास अनुदान योजनेकरीता 100 व बीजभांडवल योजनेकरीता 100 कर्ज प्रकरणाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. अनुदान योजनेत 50 हजार रुपये पर्यंत तर बीजभांडवल योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत विविध बँक माध्यमातून अर्थ सहाय्य स्वयंरोजगाराकरीता दिले जाते.
तरी स्वतःचा उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या पात्र व्यक्तिंनी आपले कर्ज प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे. अधिक माहितीसाठी साठे बिल्डींग, मोहन भाजी भंडार चौक, तापडीया नगर, अकोला येथील जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे.