• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रधानमंत्री मातृवंदना योजना; सुकाणू संनियंत्रण समितीची बैठक: ५२ हजार लाभार्थ्यांना २० कोटी ९२ लक्ष रुपयांचा लाभ वितरीत

Our Media by Our Media
July 14, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, योजना
Reading Time: 1 min read
97 1
0
मातृवंदना योजना बैठक सत्कार २ (1)
16
SHARES
703
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१४: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेद्वारे जिल्ह्यात आतापर्यंत (सन २०१७ ते जुलै २०२२) ५२ हजार २७ लाभार्थ्यांना एकूण २० कोटी ९२ लक्ष ५६ हजार रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सुकाणू संनियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आली. या योजनेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुकाणू संनियंत्रण समितीची बैठक आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे नोडल अधिकारी डॉ.विजय चव्हाण, समन्वयक आशा ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी मुर्तिजापूर डॉ. सुधीर कराळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास सोनोने, तालुका आरोग्य अधिकारी अकोला डॉ.जगदीश बनसोडे, अकोट डॉ.श्वेता सातफोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा गाडगे, डॉ.हर्षल चांडक, मनपाचे डॉ.अनुप चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सन २०१७ ते जुलै २०२२ पर्यंत या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५२ हजार २७ मातांनी लाभ घेतला आहे. त्याअंतर्गत या सर्व लाभार्थ्यांना एकूण २० कोटी ९२ लक्ष ५६ हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या ९४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. यावेळी माहिती देण्यात आली की, या योजनेचा लाभ हा तीन हप्त्यात देण्यात येतो.

योजनेचे स्वरुपः गरोदर मातांमध्ये कुपोषण व रक्ताल्पता असल्यास बाळाच्या जन्मावर व वाढीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत गरोदरपणात मातेला उत्कृष्ट आहार घेता यावा व तिला कष्टाची कामे करावी लागू नये, यासाठी ही योजना आहे. दि.१ जानेवारी २०१७ पासून ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ थेट मातेच्या खात्यात जमा केला जातो. या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अतिरिक्त लाभही दिला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदरपणाची नोंद अंगणवाडी केंद्र वा मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेत करावी. त्यावेळी प्रथम हप्ता एक हजार रुपये, सहा महिन्यानंतर दोन हजार रुपये व दोन हजार रुपये बाळाच्या जन्माची नोंद झाल्यावर व लसीकरण झाल्यानंतर दिला जातो. यासोबत जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळाल्यास सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे कार्य जिल्ह्यात उत्कृष्ट असले तरी या योजनेची माहिती अधिकाधिक मातांपर्यंत पोहोचवून त्यांनाही लाभ मिळवून देण्यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेने प्रयत्न करावे,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. विजय चव्हाण व डॉ. जगदीश बनसोडे यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.

Tags: AkolaPradhan Mantri Matruvandana Yojana
Previous Post

Eknath Shinde: मोठी बातमी, पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, दर किती कमी होणार?

Next Post

कारंजा प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने विसर्ग; सावधानतेचा इशारा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कारंजा प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने विसर्ग; सावधानतेचा इशारा

कारंजा प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने विसर्ग; सावधानतेचा इशारा

Nima Arora

जिल्हा उद्योग मित्र समिती बैठक : औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे मार्गी लावा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.