पातूर (सुनिल गाडगे) :- दि.१२/०७/२०२२ रोजी श्रीराम सेनेच्या वतीने मा.वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पातूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या शेतीचे वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत निवेदन देण्यात आले.
वन्यजीव प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती नुकसानाबद्दल प्रशासकिय पातळीवर योग्य उपाययोजना करून हे प्रश्न सोडवण्यात यावे व शेतकरी बांधवांना पिकाच्या झालेल्या नुकसानीचा योग्य तो मोबदला देण्यात यावा. यावेळी श्री. सिदाजी महाराज व्यायाम शाळचे अध्यक्ष मंगेश गाडगे, सुरेश श्रीनाथ, मधुकर उगले, अजय पाटील, प्रफुल कुरई, राहुल उगले, स्वप्नील परमाळे, करण गहिलोत, पवन तायडे, महेश बोचरे, अजय हाडके, अक्षय तायडे, अक्षय बंड, अक्षय श्रीनाथ, निखिल बारताशे, सागर माहुलीकर, मंगेश निमकंडे, विशाल काळे, प्रथमेश घोरे, जगदीश पुरुषोत्तम, धीरज बंड, हृतिक बारताशे व इतर बजरंगी उपस्थित होते.