मुंबई : बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा धगधगता विचार जिवंत ठेवला. त्यांचा तोच विचार मी आणि माझ्याबरोबरचे ५० आमदार पुढे नेतो आहोत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय. मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याची शिकवण दिली. म्हणूनच त्यांच्याच आशीर्वादाने त्यांचे विचार आम्ही पुढे नेतोय, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच हे सर्व शक्य झालं. त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी मुख्यमंत्री झालो नसतो. एका साध्या कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठिशी राहिलाय, इथून पुढेही राहिल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळी त्यांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा धगधगता विचार जिवंत ठेवला. त्यांचा तोच विचार मी आणि माझ्याबरोबरचे ५० आमदार पुढे नेतो आहोत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय. मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याची शिकवण दिली. म्हणूनच त्यांच्याच आशीर्वादाने त्यांचे विचार आम्ही पुढे नेतोय, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम युतीचं सरकार करेल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे युतीचं सरकार प्रयत्न करेल. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी यांच्या उद्धारासाठी हे सरकार काम करेल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
आज सकाळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, असं शिंदे यांनी ट्विट करुन म्हटलं होतं.