• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात स्टार्ट अप संस्कृती विकसित करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
July 12, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राजकारण
Reading Time: 1 min read
81 1
0
Nima Arora
23
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.12: जिल्ह्यात स्टार्ट अप संस्कृती विकसित होण्यासाठी नाविन्यतेस चालना देणे आवश्यक आहे. याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाविद्यालयामध्ये उद्योजकतेवर कार्यशाळा आयोजित करावी. तसेच उद्योजकता कक्षाची स्थापना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नयन सिन्हा, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, जिल्ह्यातील स्टार्टअपची यादी प्राप्त करुन शासकीय खरेदी प्रक्रीयेत त्यांचा समावेश कसा होईल यासाठी नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन जास्तीत जास्त उमेदवारांना जिल्ह्यातील नामांकीत कंपनीच्या आस्थापनेवर भरती मेळावे राबवावे. याकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्राने पुढाकार घेऊन उद्योजकता विकास कार्यक्रमाची आखणी करावी. समितीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विषयक कार्य करणे अपेक्षित असून जिल्ह्यातील सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील नामवंत उद्योजक सहकार्य करतील अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात नाविन्यतेस चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे उपाध्यक्ष असून समितीच्या इतर सदस्यात मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा कामगार अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा नियोजन अधिकारी, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांचेकडे सदस्य सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Tags: AkolaCollector Nima Arora
Previous Post

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी आढावा सभा

Next Post

जि.प. व प.स. निवडणुक; जि.प. उपाध्यक्ष व पंचायत समितीचे उपसभापती पदाच्या निवडीस स्थगित

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

जि.प. व प.स. निवडणुक; जि.प. उपाध्यक्ष व पंचायत समितीचे उपसभापती पदाच्या निवडीस स्थगित

आयटीआय १४

विशेष लेखः- रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची प्रथम पसंती ‘आयटीआय’

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.