अकोला दि. 8: महसूल विभाग व महानगरपालिका यांच्या विद्यमाने महसूल विभागातील फ्रंट लाईन वर्कर्स करिता प्रिकॉशन लसीकरण डोस सत्राचे आयोजन लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे आज करण्यात आले. या शिबीरामध्ये 61 लाभार्थ्यांनी तिसरा डोस व 64 लाभार्थ्यांनी आपला दुसरा डोस घेतला.
अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.मनिष शर्मा यांनी दिली. लसीकरण सत्राचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. यावेळी महानगरपालिका कोविड लसीकरण अधिकारी डॉ. अनुप चौधरी, आर.सी.एच. अधिकारी डॉ. विजय चव्हाण व वैद्यकीय अधिकारी डॉ. गुल्हाने उपस्थित होते.