अकोट (शिवा मगर)- शासनाच्या १७ मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण शिष्यवृत्ती रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असलेले सर्व ना परतावा शुल्क (शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क व इतर नावापरता शुल्क इ) प्रमाणे विद्यार्थ्यांच्या आधार सलग्निकृत बँक खात्यात त्यांची शिष्यवृत्ती जमा करण्याचे असे शासन निर्णयामध्ये नमुद व विहित नमुन्यात हमीपत्र घेण्यात यावे असे उल्लेख आहे हमीपत्र ही कोणत्याही मुद्रांकवर घ्यावे असले कोठेही उल्लेख नाही तसेच विद्यार्थ्यांना मुद्रांक शुल्क माफी असाही शासन निर्णय घेण्यात आला आहे. तरीही स्व.शोभाताई माणिकराव देशमुख महाविद्यालय मुंडगाव (सुलतानपूर) या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शंभर रुपयांच्या मुद्रांकावर हमीपत्र द्या याची सक्ती करण्यात येत आहे.
अशी अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाले असून व वरील महाविद्यालय व्यतिरिक्त ईतर कोणत्याही महाविद्यालयात शिष्यवृत्ती ची रक्कम जमा करण्याकरिता विद्यार्थ्यांना मुद्रांकावर हमीपत्र मागणी करण्यात येत नाही असो ही सक्ती अतिशय चुकीची असल्यामुळे आपण शासन निर्णयाची पायमल्ली करताना दिसत आहे. तरीही आपण आपल्या महाविद्यालय कमिटी सदस्यांन सोबत चर्चा करून ह्या गोष्टी कडे गांभीर्याने लक्ष देऊन ही सक्ती त्वरित थांबविण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तर्फे आंदोलनाचा पवित्रा उचलण्यात येईल. यामध्ये होणाऱ्या नुकसाणास आपला महाविद्यालय जवाबदार राहील यांची नोंद घ्यावी असे या निवेदनातून मागणी करण्यात आली. सदर निवेदन हे मनविसे जिल्हा सचिव सुरज वर्मा, मनसे शहराध्यक्ष दिपक भाऊ बोडखे यांच्या नेतृत्वात मनविसे तालुकाध्यक्ष आदित्य तळोकार, मनविसे तालुका उपाध्यक्ष तनय अस्वार यांनी दिले.
यावेळी कुणाल अतकरे, तेजस लेंघे, पवन नागले, गौरव रंधे देवा माकोडे देवा रंधे अमोल रंधे अक्षय भोंडे प्रणव पाटील गौरव वाळके आदी महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.