अकोला,दि.३०: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि. ८ जुलै रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात २२७ पदांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. मेळाव्यात रोजगार इच्छुक युवक युवतींनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात क्रेडीट ॲक्सेस ग्रामिण. लि. अकोला व बुलडाणा करीता ट्रेनी केंद्र व्यवस्थापक 50 पदे, नमस्ते व्हेंचर्स प्रायव्हेट लि. अकोला या कंपनीसाठी 26 पदे, नवभारत फर्टीलायझर, औरंगाबाद करीता सेल्स ट्रेनी- 51, महिंद्रा महिंद्रा लि. पुणे साठी 50, बजाज इलेक्ट्रिकल्स लि. पुणे साठी 50 असे एकूण 227 पदांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे.
सहभागासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या – www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणीक पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच इतर जिल्ह्यातील उमेदवारही अर्ज शकतात. ज्या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ नोंदणी करुन आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन अर्ज करुन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. जॉबसिकर अर्थात (Fing a job) हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधारक्रमांक आणि पासवर्ड वापरुन लॉगईन करा. आपल्या प्रोफाईल मधील होमपेजवरुन पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडा नंतर अकोला जिल्हा निवडा. दि.8 जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यात सहभागासाठी क्लिक करा.I Agree हा पर्याय निवडा. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन Apply बटनावर क्लिक करा.
इच्छुक उमेदवारांना दि.8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वखर्चाने व शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट साईझ फोटो सह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 0724-2433849 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.