• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दि.1 ते 15 जुलै अतिसार नियंत्रण पंधरवाडा: आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश;1 लाख 32 हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

Our Media by Our Media
June 27, 2022
in Featured, अकोला, फिचर्ड
Reading Time: 1 min read
84 1
0
दि.1 ते 15 जुलै अतिसार नियंत्रण पंधरवाडा: आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश;1 लाख 32 हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
12
SHARES
606
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.27: आरोग्य विभागातर्फे अतिसार नियंत्रण पंधरवाडा येत्या दि.1 ते 15 जुलै दरम्यान राबविण्यात येणार आहे. सध्या पावसाळ्याचा कालावधी असल्याने दूषित पाण्याच्या सेवनाने अतिसार हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यात लहान बालकांना अधिक धोका असतो, अशावेळी आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे, ओआरएसची पाकीटे तसेच झिंक गोळ्या या घरोघरी पोहोचवाव्या, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी आज येथे दिले.

अतिसार नियंत्रण पंधरवाडा जिल्हास्तरीय सुकाणु समितीची सभा आज अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जि.प. आरोग्य विभागाचे डॉ. मनिष शर्मा, मनपाचे डॉ. विजय चव्हाण. डॉ. अनूप चौधरी, जिल्हा आशा समन्वयक सचिन उनवणे, जिल्हा कक्ष विस्तार अधिकारी झिशान अहमद, डॉ. जगदीश बनसोडे, डॉ. श्वेता सपकाळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या पंधरवाड्यात ग्रामिण भागासाठी 1 लाख 7 हजार 292 तर शहरी भागासाठी 25 हजार 447 अशा एकूण 1 लाख 32 हजार 739 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सद्यस्थितीत आरोग्य यंत्रणेकडे 1 लाख 54 हजार 783 ओ.आर.एस. पाकीटांचा साठा उपलब्ध असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

बैठकीत माहिती देण्यात आली की, अतिसार नियंत्रणाचे उद्दिष्ट हे अतिसारामुळे होणारे बालमृत्यू हे शून्यावर पोहोचविणे असून अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठीची ही पूर्व तयारी आहे. या कालावधीत अतिसार लागण झालेल्या सर्व बालकांना ओआरएस व झिंक गोळ्यांचे वाटप करुन सुनिश्चित पद्धतीने पोहोचविले जाते. पाच वर्षाखालील बालकांच्या अतिसार व्यवस्थापनासाठी पालकांचे वा बालकांची काळजी घेणारांचे समुपदेशन केले जाते. अतिजोखमीची क्षेत्रे व दुर्बल घटकांवर जसे शहरी भागात झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, भटक्या जमातींची राहण्याची ठिकाणे, वीटभट्टी कामगार, स्थलांतरीत मजूर, बेघर मुले या सारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाते. तसेच मागील दोन वर्षात अतिसार साथ असलेल्या क्षेत्रात तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेल्या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जाते.

या व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करुन त्यात सार्वजनिक आरोग्य विभागासोबत महिला बालविकास, शिक्षण, पाणीपुरवठा तसेच डॉक्टरांच्या तसेच अन्य अशासकीय संस्थांचाही समावेश करण्यात आला आहे. अशाच प्रकारे तालुकास्तरावरही समिती गठीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Previous Post

मुलींसाठी आयटीआय प्रशिक्षण; प्रवेश प्रक्रिया सुरू

Next Post

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पातुरात वीज कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Sakhi One Stop Center

‘सखी वन स्टॉप सेंटर’ बाबत जनजागृती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.