अकोला,दि.11-: प्रतिबंधीत प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती तयार करण्याऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील 10 ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधीत प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ति तयार करण्याऱ्या कारखान्यावर कारवाई करुन अंदाजे पाच लाखाचा माल सिल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून त्यांना आपले म्हणने मांडण्याकरीता सोमवार दि. 13 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती नायब तहसिलदार महेंद्रकुमार आत्राम यांनी दिले आहे.
ही कारवाईत नायब तहसिलदार महेंद्रकुमार आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडळ अधिकारी नंदकिशोर माहोरे, तलाठी राजेंद्र देवीकर, आ.डी. सोनोने, ज्योती कराळे, अर्जना देवकते तसेच गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहने बुंदेले व सदस्य सतिश अश्वार, अतुल अढाऊ, किषन गुप्ता यांनी केली.