• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Rajya Sabha Election 2022: “…तर आम्ही विरोध करण्याचे कारण नाही”; MIM च्या भूमिकेवर संजय राऊत (Sanjay Raut)स्पष्टच बोलले

Our Media by Our Media
June 10, 2022
in Featured, फिचर्ड, महाराष्ट्र, राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
100 7
0
sanjay raut
15
SHARES
761
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आपापल्या उमेदवारासाठी मोठी चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व पक्षीय आपापल्या आमदारांना घेऊन विधिमंडळात पोहोचले आहेत. राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) मतदान प्रक्रिया सुरु होण्याच्या अवघे काही तास आधी एमआयएम पक्षाने आपली भूमिका जाहीर करत महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, एमआयएमशी मतभेद असले तरी महाविकास आघाडीला मतदान करणार असतील तर आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे.

पाठिंबा मागायचाच असेल, तर तो उघडपणे मागा. आमच्या मतदारसंघातील विकासकामं होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली होती. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे दोन्ही आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात इम्पियाज जलील यांनी ट्विट केले असून, भाजपचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना, संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

महाविकास आघाडीचे सर्व उमेवार निवडून येतील

महाविकास आघाडीचे सर्व उमेवार निवडून येतील, असा विश्वास पुन्हा एकदा संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत चुरस वगैरे काही नाही. विरोधकांकडून तसा भ्रम निर्माण केला जात असल्याचा दावाही राऊतांनी यावेळी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. आजच्या मतदानात आकडे स्पष्ट दिसतील. महाविकास आघाडीकडील आकडे जास्त झाले तरी भाजपला धक्का बसू नये, अशी अपेक्षा आहे, असा टोलाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही

एमआयएमने (MIM ) महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे समजले. भाजपला पराभूत करण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे. आम्हीही अनेक विषयांवर भूमिका घेतल्या आहेत.  एमआयएमशी शिवसेनेचे असलेले मतभेद कायम राहणार. मात्र, ते काँग्रेसला मतदान करणार असल्याने काँग्रेसशी त्यांचे एखाद्या विषयावर काही जुळले असेल, तर आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही, असे (Sanjay Raut) संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच ज्यांचा जेवढा कोटा बैठकीत ठरला आहे, त्याप्रमाणे मतदान होणार आहे. गणित पूर्णपणे जुळवलेले आहेत. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवारांशी चर्चा केली. प्रत्येक पक्ष एकमेकांना मदतच करतायत. खेळीमेळीने निवडणूक लढवली जात आहे.

Tags: BJPElectionMIMRajya Sabha Election 2022Sanjay Raut
Previous Post

हरभरा खरेदी उद्दिष्टात 15 हजार क्वि.ने वाढ

Next Post

विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा

विशेष वृत्त - पावसाळ्यातील वीजसुरक्षा

प्रतिबंधीत प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्‍या मुर्ती विक्री प्रकरणी कारखान्यावर कारवाई

प्रतिबंधीत प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्‍या मुर्ती विक्री प्रकरणी कारखान्यावर कारवाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.