अकोट (देवानंद खिरकर)- पो. स्टे. अकोट ग्रामीण चे ठाणेदार नितीन देशमुख व स्टाफ असे आज दिनांक 07/06/2022 रोजी पहाटे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ह्यांना गोपनीय माहिती मिळाली की येवदा येथून एक इसम त्याचे साथीदारासह अकोट शहरकडे मोटर सायकलने अवैध रित्या गॊवंश मास घेऊन जात आहे.
अश्या गोपनीय माहिती वरून पो नि नितीन देशमुख ह्यांनी दर्यापूर अकोट रोडवर ढगाफाटा येथे पो स्टे स्टाफ व दोन पंच यांचे मदतीने नाकाबंदी करून सकाळी 06.30 वा. चे दरम्यान इसम नामे मोहम्मद अशपाक मोहम्मद मोहम्मद नजीर, वय 45 वर्ष, मोहम्मद तन्वीर मोहम्मद अशपाक, वय 19 वर्ष, दोन्ही रा. पेठपुरा येवदा, ता. दर्यापूर, जि. अमरावती ह्यांच्याकडून 44 किलो 500 ग्रॅम गोवंश मांस किंमत 8,900 रू व tvs मो सा क्र Mh 27. AS. 3252 कींमत 30,000 रू असा एकूण 38,900 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूदआरोपिना अटक करण्यात आली असून पुढील तपास Asi लिखार ब नं 621 करीत आहे. सदर कार्यवाही मा पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर, मा अपर पोलीस अधीक्षक मा. मोनिका राऊत मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी अकोट मा. रितू खोखर मॅडम ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, npc जऊळकर, pc शैलेश जाधव, pc गोपालसिंग डाबेराव, pc सचिन कुलट ह्यांनी केली.
अवैध गोवंश व गोवंश मांसचे अनुषंगाने पो स्टे अकोट ग्रामीणची मागील चार दिवसात 5 पाचवी कार्यवाही आहे.